Type Here to Get Search Results !

फलटण: कामधेनु दत्तक ग्राम योजने अंतर्गत मौजे पिंप्रद येथे शिबीर संपन्न

फलटण: कामधेनु दत्तक ग्राम योजने अंतर्गत मौजे पिंप्रद येथे शिबीर संपन्न


आज दि. १२/०१/२०२२ रोजी मौजे पिंप्रद येथे कामधेनु दत्तक ग्राम योजने अंतर्गत पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती फलटण व पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ विडणी यांचे संयुक्त विद्यमानाने *आदरणीय श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर(बाळराजे)* सभापती - पंचायत समिती,फलटण यांचे शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन करणेत आले.

या कार्यक्रमामध्ये उपस्थित पशुपालक यांना जनावरांसाठी जंत निर्मुलन, गोचीड निर्मुलन, क्षार मिश्रण, जीवनसत्व इ. बाबी तसेच वैरण विकासासाठी मका बियाणे यांचे वाटप मा. श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर सभापती, मा. सौ. सुशीला नाळे पंचायत समिती सदस्य, मा.सौ.सविता मदने सरपंच, मा.सौ.राजश्री कापसे उपसरपंच, मा. श्री. विनायक गुळवे सहा. गट विकास अधिकारी, कामधेनु पशुपालक मंडळ अध्यक्ष श्री. विशाल साळुंखे, उपाध्यक्ष श्री. धनराज भगत यांचे हस्ते करणेत आले. यावेळी मा.सभापती यांनी पशुसंवर्धन विषयक सर्व योजनाचा लाभ घेऊन आपल्या पशुधनाचे योग्य संगोपन करून आर्थिक प्रगती साध्य करावी असे आवाहन करणेत आले. पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ग्रामीण पातळीवर गरजू व होतकरू लाभार्थीना मिळणेसाठी या पुढे मी स्वतः विशेष लक्ष देणार असलेबाबत सांगितले. सदर कार्यक्रमासाठी माजी सरपंच, मार्केट कमिटी संचालक श्री. संतोष शिंदे, विकास सोसायटी संचालक श्री. किरण शिंदे पाटील, प्रगतशील शेतकरी श्री. राजाराम भगत, पोलीस पाटील श्री. सुनील बोराटे, प्रगतशील पशुपालक श्री. लक्ष्मण ढमाळ, ग्रामसेवक श्री. बळीप, डॉ. राहुल भगत उपस्थित होते.     
     या कार्यक्रमामध्ये उपस्थित पशुपालकांना मुरघास, मुक्तसंचार गोठा व्यवस्थापन, वंध्यत्व निवारण आणि किसान क्रेडीट कार्ड योजना या विषयाचे डॉ. व्ही.टी. पवार, सहा.आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. इंगवले, डॉ. बागवान आणि डॉ. भुजबळ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नंदकुमार फाळके पशुधन विकास अधिकारी (विस्तार) तर सूत्रसंचलन डॉ. भोसले यांनी केले. 
शिबिराचे उत्कृष्ठ नियोजन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ विडणी येथील डॉ. सी.टी. भोसले यांनी केले. शिबीर यशस्वी होणेसाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad