Type Here to Get Search Results !

रायगड किल्ला आणि परिसर विकासाचे काम पूर्णत्वाला नेणार असून रायगड किल्ला परिसरातील २१ गावांचा विकास व्हावा

रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा आढावा आज बैठकीत घेतला. महाविकास आघाडी सरकार रायगड किल्ला आणि परिसर विकासाचे काम पूर्णत्वाला नेणार असून रायगड किल्ला परिसरातील २१ गावांचा विकास व्हावा, 
स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाची कामं गतीनं व्हावीत,
 कामांची गुणवत्ता, दर्जा कायम राखावा, या विकास कामांना गती मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, पर्यटन विभाग, पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन यांनी समन्वय राखून प्राधिकरणाला कामकाजात सहकार्य करावे, अशा सूचना केल्या.
 या प्राधिकरणाला मंजूर असलेला यंदाच्या आर्थिक वर्षातील नियतव्यय शंभर टक्के वितरीत करावा, असे निर्देश बैठकीत दिले. तसंच प्राधिकरणाला प्राधान्यानं निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. रायगड किल्ल्याचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाला निधी कमी पडू देणार नाही. 
या प्राधिकरणाच्या कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या निधीचा विनियोग पालकमंत्री, जिल्हा प्रशासन व प्राधिकरणानं समन्वयानं करावा. राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा, समाधीचं संवर्धन, जतन करण्याचं काम, शिवसृष्टी उभारणी अशी नियोजित सर्व कामं शास्रोक्त पद्धतीनं करावीत. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूंचं जतन आणि संवर्धन करावं,अशा सूचना केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad