प्रतिनिधी :- रफिक अत्तार
पंढरपूर येथील संतपेठ भागातील न पा शाळा क्र ७येथे कोरोना प्रतिबंधक लस प्रक्रियेत कायमच दिरंगाई होत असून गुरुवारी दि२०जानेवारी रोजी चक्क सकाळी१०वाजता लसीकरण कार्यक्रम असूनही तो दिरंगाईमुळे दोन तास उशिरा म्हणजे दुपारी१२वाजता सुरू करण्यात आला. यात जिल्हा आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ नागरिकांना दिसून येत आहे, सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पंढरपूर आणि बार्शी या तालुक्यात आढळून येत आहेत, यामुळे लसीकरण करण्यासाठी मोठी गर्दी होते,
मात्र दोन,दोन तास ताटकळत वाट बघावी लागत असल्याने गोरगरीब, हातावर पोट असणारे शेकडो लोक नाराज होऊन परत जात आहेत, यात महिला आणि मुलींची संख्या मोठी आहे. शेकडो महिला घरातील स्वयंपाक व ईतर कामे सोडून लसीकरण करण्यासाठी येतात, पण मोठ्या प्रमाणात वाट बघावी लागते, कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी लसीकरण वेगाने होणे गरजेचे आवश्यक असताना थातूर मातूर करणे देऊन वारंवार दिरंगाई होत आहे,यात वैद्यकीय अधिकारी ,तसेच जिल्हा आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचा कामचुकारपणा, आणि बेशिस्त दिसून येत आहे.