उमरखेड येथे खळबळजनक घटना डॉक्टरची केली गोळीबार करून हत्या
उमरखेड येथील उत्तरवार रुग्णालयाचे सरकारी डॉक्टर श्री . धर्मकारे यांच्यावर आज दुपारी साडेचार वाजता उत्तरवार रुग्णालय परिसरातील पुसद रोड वरील टपरी समोर अज्ञात इसमाने गोळीबार करून हत्या केल्याने उमरखेड मध्ये तणावाचे वातावरण आहे .
ही हत्या कोणी आणि का केली याची पोलीस चौकशी करत आहेत . तसेच तसेच डॉक्टरचा स्वभाव अतिशय चांगला होता आणि त्यांची कुणाशी दुश्मनी असेल असे वाटत नाही अशी जनमानसात प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे
या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करावी अशी मागणी आहे होत आहे