यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी - संजय जाधव
बहुजन समाज शिकला पाहिजे यासाठी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख या महापुरुषांनी शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु राज्य शासन व केंद्र शासनाच्या दुर्लक्षित पणामुळे महाराष्ट्रातील शाळा बंद झाल्या असून,शिक्षणाचे दारच बंद झाले आहेत. त्यामुळे येणारी पिढी शिक्षित होण्यापासून थांबली असून ग्रामीण भागांतील बहुजनांचा विकास थांबत आहे, असे प्रतिपादन उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाकळी(ई )ग्रामपंचायत येणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर जाधव,गजानन जाधव व पालकांनी केले.
यावेळी टाकळी(ई )येथील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक वर्ग यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उमरखेड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले.ग्रामीण भागातील शाळा सुरु नं केल्यास आंदोलनही करू असे सांगितले.
सध्यस्थितीत कोरोनामुळे शासनाने विविध निर्बंध घातले आहे. लग्न किंवा इतर सर्व समारंभासाठी 50 व्यक्ती एकत्रित जमण्यावर निर्बंध घातले. अगदी त्याच धर्तीवर विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन शाळा सुरू करण्यात याव्या. ग्रामीण भागातील बहुतांश शाळेत 50 पेक्षा विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यामुळे शासनाने कोविडच्या नियमांचे पालन करत शाळा सुरू कराव्या, असे निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळू चंद्रे प्रभाकर हाके संदेश मोरे भारत जाधव गजानन गव्हाळे विजय चव्हाण लक्ष्मण राठोड व पालक वर्ग उपस्थित होते
प्रतिक्रिया
कोरोनामुळे मागिल 2 वर्षांपासून शाळांमधून शिक्षण बंद आहे. बहुजनांची मुले शिकले नाही तर समाज मागासल्या जाईल, याचा परिणाम फार वाईट होईल.त्यामुळे येणाऱ्या पिढीला शिक्षण चांगल्या दर्जाचे मिळावे, म्हणून शाळा लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या. शिक्षणामुळे येणारी पिढी शिक्षित करायचे असेल तर, सर्व नियमाचा उपयोग करून शासनाने ताबडतोब शाळा सुरू कराव्यात, नाहीतर पालक वर्ग आदोलन करेल
सुधाकर जाधव
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष टाकळी (ई)