निराधार योजनेचे शिबीर प्रत्येक प्रभागात घ्यावीत
आमदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या तहसिलदार अंजली मरोड यांना सुचना
सोलापूर : दि. 13 जानेवारी 2022 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांची संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना 21000 रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला देण्यात यावे व योजनेतील इतर विविध अडचणी दुर करण्यात यावी याबाबत तहसिलदार अंजली मरोड यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये सोलापूर शहरामध्ये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी मोठ्या प्रमाणात गोर-गरीब असून त्यांची जबाबदारी सांभाळणारे त्यांच्या कुटुंबात कोणीही नसल्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाकरीता अनेक अडचणी येत आहेत. याबद्दल अनेक नागरीकांनी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळण्याकरीता आपल्या कार्यालयाकडे अर्ज सादर करत असतात. सदर योजनेकरीता उत्पन्नाची मर्यादा 21000 रुपये ठरविण्यात आली आहे. परंतू सेतु कार्यालयाकडून लाभार्थ्यांना 21000 रुपयांचा उत्पन्न दाखला देण्याकरीता सर्कलमार्फत चौकशी करून तात्काळ उत्पन्न दाखला उपलब्ध करून देण्यात यावे.
सोलापूरातील बहुसंख्य नागरीक कष्टगरी, गोर-गरीब व निराधार असून ते संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेपासून वंचित राहणार नाही यांची प्रशासनाने दक्षता घेतली पाहीजे. तसेच सदर लाभार्थ्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळेल आणि जास्तीत जास्त नागरीकांना या योजनेचा लाभ मिळण्याकरीता सोलापूर शहरातील प्रत्येक प्रभागात तहसिल कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे शिबीराचे आयोजन करून त्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता सदर शिबीरामध्ये करून गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे अशी सुचना आमदार प्रणिती शिंदे यांनी तहसिलदार अंजली मरोड यांना दिल्या.
यानुसार मा. तहसिलदार अंजली मरोड यांनी येत्या काही दिवसांमध्ये सोलापूर शहरातील प्रत्येक प्रभागात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना शिबीराचे आयोजित करण्यात येतील व तात्काळ लाभार्थ्यांचे प्रकरणे तात्काळ मंजूर करण्याचे व पहिले संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे शिबीर दि. 04 फेब्रुवारी 2022 रोजी लोधी गल्ली येथे आयोजित करण्याचे आश्वासन दिले.