अकलूज दि. २५ प्रतिनिधी
पंचायत समिती सदस्य सौ प्राजक्ता स्वप्निल वाघमारे मेडद गणाच्या एकमेव शिवसेना पक्षाच्या सदस्या असून हिंदुहृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मौजे खळवे व जांभूड येथे 15 वा वित्त आयोग पंचायत समिती स्तर सन 2020 -21 च्या निधीतून लाकडी डायस, दहा खुर्च्या व तीन कचरापेट्या असे दहा सेट देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
खळवे व जांबूड या जिल्हा परिषद शाळे समवेत चाकोरे, कचरेवाडी, तिरवंडी, मारकडवाडी, उंबरे - दहिगाव, कदमवाडी व बागेचीवाडी येथील शाळांसाठी या डायस, खुर्च्या व कचरापेटी यांचे वाटप होणार आहे.
या वेळी जिल्हा परिषद शाळा संबंधी विविध विषयावर चर्चा करून सूचना व निवेदने करण्यात आली तसेच दिलेल्या या भौतिक गरजांच्या वस्तूंमुळे शाळांकडून समाधान व्यक्त केले जात आहे या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य सौ प्राजक्ता वाघमारे, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील वाघमारे, ज्येष्ठ नेते नारायण काका पाटील, सरपंच उपसरपंच दादासाहेब ननावरे, महावीर माने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ सविता केचे, माऊली प्रधाने, केंद्रप्रमुख नाचने सर, मोहन पारसे, सुधीर महाडिक, संतोष माने, सुरेश सकट, शिवराम गायकवाड, आकाश भोसले दोन्ही जि प शाळांचे मुख्याध्यापक, दोन्ही ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.