स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदाच राज्याचे नेतृत्व करण्याची संधी पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली गावाला मिळाले आहे या परेड करिता महाराष्ट्रातील 57 जणांची निवड करण्यात आली होती यामध्ये 34 मुले आणि 23 मुलींची निवड करण्यात आली होती याचे नेतृत्व करण्याची संधी विनायक नाईकनवरे या 21 वर्षीय युवकाला मिळाली होती पटवर्धन कुरोली सारख्या ग्रामीण भागातून आलेला हा युवक पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील या महाविद्यालयात बी एस सी च्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे घरची परिस्थिती बेताचीच आहे वडिलांच्या मृत्यूनंतर आई दुसऱ्याच्या शेतात काम करते आहे,
या विषयी बोलताना विनायक म्हणाला की मला खूप आनंद झाला आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालया कडून रिपब्लिकडे कॅम्प 2022 साठी पाठविण्यात आले त्यानंतर 38 महाराष्ट्र बटालियन कडून रिपब्लिकनडे 2022 साठी माझी निवड करण्यात आली 9 पासून ते 15 ऑक्टोंबर पर्यंत पुण्यात आय सी बी ट्रेनिंग सेंटर मध्ये सराव सुरू केला
त्यामध्ये पुणे ग्रुप मध्ये निवड झाली त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातील सात ग्रुपची आंतरराज्य स्पर्धा दिनांक 17 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पार पडली त्यातून पंतप्रधान रॅली व रिपब्लिक डे कॅम्प साठी निवड झाली नंतर महाराष्ट्र संचनालयात मध्ये निवड झाली व तब्बल दोन महिन्यांनी 18 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये आलो येथे आल्यानंतर महाराष्ट्र संचनालयात परेड कमांडर म्हणून निवड झाली 26 जानेवारीच्या परेड नंतर 28 जानेवारीला होणाऱ्या पंतप्रधान रॅलीमध्ये मी महाराष्ट्र संचनालयाचे नेतृत्व करणार आहे असे त्यांनी सांगितले