तालुका प्रतिनिधी / संजय जाधव
उमरखेड स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ साठी उमरखेड चे सामाजिक कार्यकर्ते दीपक ठाकरे ह्यांची निवड करण्यात आली असून २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनी त्यांना उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड व नगरपरिषद उमरखेड चे मुख्याधिकारी चारुदत्त इंगले ह्यांच्या हस्ते नगरपरिषद येथे नियक्ती पत्र देण्यात आले
दीपक ठाकरे हे मागील १५ वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत असून ते उद्देश सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पूर्व महाराष्ट्र अध्यक्ष, जिल्हा शांतता समिती सदस्य, औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे मा. कार्याध्यक्ष, अमन
शांतीदूत परिवारचे अध्यक्ष, नाम फॉउंडेशन, सह्याद्री देवराई संस्थे सोबत कार्य करत असून, वर्ल्ड कॉन्स्टिस्ट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन चे ते सदस्य आहेत.
दीपक ठाकरे यांनी वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन, जलसंवर्धन व ईतर पर्यावरण जनजागृती विषयी भरीव अशी कामगिरी केली असून त्यांना ब-याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना नगरपरिषद उमरखेड चे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.