राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती व छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रक्तदान शिबीर आयोजित करून केले अभिवादन
श्रीपूर दि.१६ :
राष्ट्रमाता स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब जयंतीनिमित्त व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून श्रीसेवा हॉस्पिटल श्रीपुर या ठिकाणी राजे प्रतिष्ठान कामगार सेना व राजा शिवछत्रपती परिवार सोलापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला
या रक्तदान शिबीराप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते मा.श्री.राजकुमार विजयकुमार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरूवातीला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मा.श्री.राजकुमार विजयकुमार पाटील व डॉ.सुधीर पोफळे, डॉ.सुहास बनसोडे, डॉ.नागन्नाथ दगडे, डॉ.विनोद शिंदे तसेच मा.श्री.लक्ष्मण (आण्णा) गरड आदी मान्यवरांनी अभिवादन केले
त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यावेळी गुरूवर्य दादासाहेब गाडे (सर),सुरज आलगुडे (सर),राजे ग्रुप महाळूंग-श्रीपूरचे अध्यक्ष मा.बबन कदम आवर्जून उपस्थित होते तसेच राजे प्रतिष्ठान कामगार सेना माळशिरस तालुकाध्यक्ष मा.हिम्मत नागणे, उपाध्यक्ष मा.शिवराम गायकवाड,युवक अध्यक्ष मा.बिभीषण पाटील व सोलापूर विभागप्रमुख मा.सुरज पाटील,मा.राहूल चव्हाण,मा.धनाजी इंगोले, मा.सोमनाथ इंगोले, मा.प्रशांत पाटील तसेच सोलापूर परिवारातील रणरागिणी दिपालीताई घोरपडे यांनी रक्तदान करून समाजातील महिलांवर्गापुढे एक नवा आदर्श निर्माण केला
अनेक जिवलग ६१ जण रक्तदात्यांनी रक्तदान करून भरघोस प्रतिसाद दिला यावेळी सुनील खटके, सिताराम शिंदे,सागर देठे,सचिन नलवडे, मा.पैलवान आबा वाघमारे मित्र परिवार, मा.रणजीत चव्हाण मित्रपरिवार व पैलवान गणेश चव्हाण उपस्थित होते आणि सुमित नागणे, सुरज गुळुमकर,विजय हावळे व श्रीसेवा हॉस्पिटल स्टाफ यांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून करण्यात आला तसेच कार्यक्रमात उपस्थित पंढरपुर ब्लड बँक स्टाफ व उपस्थित रक्तदात्यांचे आभार मा.राहूल चव्हाण यांनी मानले