प्राचीन ऐतिहासिक महत्त्व लाभलेला हा किल्ला राज्य पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून या विभागामार्फत गडावर काही विकासकामे करण्यात आलेली आहेत, त्यामध्ये कोणत्याही शास्त्रोक्त पद्धतीचा वापर न करता थेट सिमेंटचा वापर करून कामे केल्याचे निदर्शनास येते.
नेहमी लोकांचा राबता असणाऱ्या या किल्ल्याचे योग्य पद्धतीने जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. स्थानिकांच्या सहकार्यातून 'फोर्ट फेडरेशन'च्या वतीने या किल्ल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने काम करण्याचा आमचा मानस आहे.