मेंगडेवाडी परिसरात कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अतिशय साध्या पद्धतीने प्रजासताक दिन साजरा
लोणी-धामणी : प्रतिनिधी : कैलास गायकवाड.
दिः२७/०१/२०२२.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी, धामणी,लाखणगाव, खडकवाडी, शिरदाळे, पहाडघरा,देवगाव,पोंदेवाडी,जारकरवाडी, निरसुडसर,मेंगडेवाडी परिसरात कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे अतिशय साध्या पद्धतीने प्रजासताक दिन साजरा करण्यात आला.
गेली जवळ-जवळ दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामळे सर्वच कार्यकम कोरोनाचे नियम पाळूनच साजरे केले जातात.चालू वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांविना प्रजासताक दिन साजरा झाला.त्यामूळे ना घोषणा, ना प्रभात फेरी, ना विविध संस्कृतीक कार्यकम त्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने हा प्रजासताक दिन साजरा करण्यात आला.
मांदळेवाडी (ता.आबेगाव ) येथेही कोरोनाचे सर्वच नियम पाळून निवृत लष्करी जवानांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी अशोक गोरडे, विकास मांदळे, विकास आदक, निवृत्ती आदक, रामदास पालेकर, पोलिस पाटील काळूराम पालेकर पाटील,सरपंच कोंडीभाऊ आदक, उपसरपंच निकिता आदक, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निवृत्त लष्करी जवनांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला
: मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे निवृत्त लष्करी जवानांचा सत्कार करण्यात आला.
_________________________