यवतमाळ प्रतिनिधी:- संजय जाधव
२६ जानेवारी रोजी तहसील कार्यालय महागाव येथे तालुका दंडाधिकारी मा.डॉ. विश्वंभर राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
यावर्षी ध्वजारोहन कार्यक्रमासाठी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करण्यासाठी आधिकृत असलेली व सतत १६ वर्षापासून कार्यरत असणारे TDRF जवानांनी महागाव तहसीलदार यांचाकडून शासकीय स्तरावरून ध्वारोहनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ध्वजारोहण होताच महागाव कंपनीच्या TDRF जवानांकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना व पोलीसांकडून शस्त्रसलामी देण्यात आली. COVID 19 मध्ये TDRF जवानांनी विविध प्रकारे सेवा कार्य केले व मदत कार्य केले आहे. व त्या कार्याची दखल घेऊन TDRF जवानांचा मा. तहसीलदार साहेब यांच्या हस्ते कोविड योद्धा (COVID Warrior) म्हणून सेवाकार्य पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ध्वारोहण कार्यक्रमा प्रसंगी तहसील कार्यालयात मा. तहसीलदार डॉ. विश्वंभर राणे TDRF महागांव कंपनीचे कंपनी कमांडर आविष्कार बागल, हर्षद पाईकराव, सहा. कंपनी कमांडर ऋषिकेश शाळके, कंपनी ड्रिल इंस्ट्रकटर ओंकार देवकते, कंपनी सेक्शन कमांडर रोहित कदम, महेश कदम, सदस्य संजिवनी पवार, सूरज सूर्यवंशी, त्रिषाला शिरगरे, अश्विनी साखरे इ. TDRF आधिकारी व जवान उपस्थित होते.