दसुर गावचे युवा नेते मा.श्री. किरण राजकुमार सावंत यांची माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष मा.श्री.विलास चेळेकर साहेब यांनी निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस व सातारा जिल्हा प्रभारी मा.श्री.संकल्पभैया डोळस यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. ज्ञानेश्वर काटे अशोक आव्हाड, शाहरुख मुलाणी, दत्तात्रय गवळी, रविराज माने, भागवत काळे, अक्षय शिंदे, अजय काळे, काकासो कागदे, पवन गवळी, तुषार माने, विशाल माने, तुषार कागदे व कार्यकर्ते उपस्थित होते.
किरण सावंत हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम करत असून समाजातील गोरगरीब तसेच सर्वसामान्य लोकांना नेहमीच मदत करत असतात. त्यांनी रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, गोरगरीब समाजातील लोकांना कोरोना काळात धान्य वाटप करणे अशाप्रकारचे कार्यक्रम केले आहे त्यांच्या निवडीबद्दल माळशिरस तालुक्यासह विविध मान्यवरांद्वारे अभिनंदन केले आहे
सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहेत. नुतन तालुकाध्यक्ष किरण सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना.श्री अजितदादा पवार साहेब,प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री मा.श्री. जयंतराव पाटील साहेब खासदार मा.सौ.सुप्रिया ताई सुळे,प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. दिपक आबा साळुंखे-पाटील प्रदेश सरचिटणीस मा.श्री. शंकरनाना देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.बळीराम ( काका ) साठे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष मा.श्री. विलास चेळेकर साहेब, प्रदेश युवक सरचिटणीस मा.श्री. संकल्प डोळस साहेब, माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.श्री. उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.