Type Here to Get Search Results !

यशोगाथा एका उद्योजकाची:एके काळी मजुरी करणारा तरुण आज देतोय अनेकांना रोजगार

यशोगाथा एका उद्योजकाची:एके काळी मजुरी करणारा तरुण आज देतोय अनेकांना रोजगार 
  
जिल्हा खादी ग्रामोद्योग सोलापूर अधिकाऱ्यांची कृषी अँग्रो इंजिनिअरिंगला भेट
मोहोळ ही सक्सेस स्टोरी आहे,मोहोळ तालुक्यातील छोट्या खेडेगावातील.आज आपण पाहिले तर अनेक मोठी माणसे मोठी होताना दिसतात.पण ती मोठी झाल्याचे आपण त्यांना फक्त पाहतो पण मोठी होताना त्यांना अनेक संकटांना सामना करावा लागतो.याचेच एक उदाहरण म्हणजे मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथी तरुण होय.हा तरुण आज अनेकांना रोजगार देत आहे. २००५ मध्ये सुरु केलेल्या छोट्या वर्कशॉप पासून आज एका मोठ्या कंपनीमध्ये त्याचे रूपांतर त्यांनी केले आहे. म्हणजेच पंधरा वर्षांपूर्वी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचे रूपांतर एका विशाल वृक्षामध्ये झाल्याचे दिसते.
यशस्वी उद्योजक खादी ग्रामोद्योग सोलापूर, राज्यस्तरीय उद्योग भूषण कोल्हापूर, शासनाचा उत्कृष्ट उद्योग बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशन सांगली, व उद्योजकता मॅग्नेटीक महाराष्ट्र अशा अनेक पुरस्कारांनी श्री विष्णू रामदास थिटे यांना सन्मानित करण्यात आले आहे.शेती अवजारांचा कारखाना काढून ते एक प्रकारे शेतकऱ्यांची सेवा करत असल्याचे दिसते.उच्च व टिकाऊ दर्जाचे उत्पादन तयार होत असल्याने कंपनीची दाखल घेत वर्ष २०१३ मध्ये आय एस ओ मानांकन देऊन कंपनीला गौरवण्यात आले आहे.
त्यांनी तयार केलेल्या लोकनेते नांगराला महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि तो एवढ्यावरच थांबणार नसून पुणे सोलापूर हायवे वर चिखली जवळ १० एकरामध्ये त्यांच्या मोठ्या प्रोजेक्टचे काम चालू आहे.
परंतु या सर्वांचे श्रेय ते स्वतः कडे न घेता,याचे श्रेय ते आपल्या कामगारांना देतात. याचे उदाहरण म्हणजे ६ जानेवारी रोजी जिल्हा खादी ग्रामोद्योग सोलापूर येथील अधिकाऱ्यांची टीम चंद्रमोळी मोहोळ येथील त्यांच्या कृषीसेवा ऍग्रो एंजिनिअरिंग कारखान्यास भेट देण्यास आली. त्या वेळी अधिकाऱ्यांचा सत्कार स्वतः न करता आपल्या कामगार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आलेले अधिकारी भारावून गेले.जिल्हा खादी ग्रामोद्योगचे मुख्य लेखाधिकारी हिरमुखे साहेब यांनी आपणास लागेल ती मदत आमची टीम करेल असे आश्वासन दिले. आणि भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी कारखान्याचा कामगार वर्ग व जिल्हा खादी ग्रामोद्योग सोलापूरचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad