Type Here to Get Search Results !

निंभोरे येथे शालेय शिक्षण समिती च्या निवडी बिनविरोध

                                     निंभोरे येथे शालेय शिक्षण समिती च्या निवडी बिनविरोध 
 रविंद्र वळेकर निंभोरे येथील वळेकर वस्ती शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष पद ईश्वर मस्के व उपाध्यक्ष पदी सोमनाथ वळेकर यांची निवड करण्यात आली . तसेच जि . प . प्रा . शाळा येथे पंजाब गाडे यांची निवड अध्यक्ष पदी तर दादासो वळेकर यांची निवड उपाध्यक्ष पदी करण्यात आली . 
आणि फरतडे वस्ती येथे मनोहर ( बापू ) वळेकर यांची अध्यक्ष पदी तर हरिभाऊ वळेकर यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . या सर्व निवडी बिनविरोध पद्धतीने करण्यात आल्या . या निवडी राष्ट्रवादी पदवीधर चे करमाळा तालुका अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते रविदादा वळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या . निवडी नंतर रविदादा वळेकर यांचे शुभ हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी दादा पाटील , ईश्वर मस्के , समाधान पाटील साहेब , ज्ञानेश्वर वळेकर , नाथाभाऊ शिंदे , महेश वाघमारे , सोमा वळेकर , पंजाब गाडे , दादासो वळेकर , भारत मारकड , चंदू जगताप , नितीन गायकवाड , मनोहर वळेकर , हरिभाऊ वळेकर आदी पालक व गावकरी तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते . 
z

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad