Type Here to Get Search Results !

ऊमरखेड येथे वीरशैव लिंगायत मोक्षधामात स्वच्छता अभियान

ऊमरखेड येथे वीरशैव लिंगायत मोक्षधामात स्वच्छता अभियान
उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
 
 जीवनात स्वच्छतेचे महत्व कुणीही नाकारू शकत नाही. परिसर स्वच्छ असला की रोगराईचा नायनाट होतो. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो. परिसराच्या स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष करतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात घान पसरते.कोणे एके काळी घाणीचे साम्राज्य असलेल्या व सद्यस्थितीत वृक्षांचे नंदनवन असलेल्या येथील शिवाजी वार्ड स्थित वीरशैव लिंगायत मोक्षधाम परिसरात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसरातील कॅरीबॅग, बॉटल ,केरकचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. मोक्षधाम परिसर स्वच्छ व सुंदर आहेच तो अधिक स्वच्छ व्हावा व स्वच्छतेविषयी परिसरातील लोकांची जनजागृती व्हावी या उद्देशाने हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
 झाडांचा पालापाचोळा, गाजर गवत, तणकटाचीही विल्हेवाट लावण्यात आली.
 प्रत्येकाच्या जीवनात स्वच्छतेविषयी महत्त्व आहे स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी ,स्वच्छ वातावरण यामुळे मनुष्य निरोगी राहण्यास मदत होईल. या स्वच्छता अभियानात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेा तसेच वीरशैव लिंगायत मोक्षधाम सेवा समितीचे सर्वश्री दिपक ठाकरे, प्रभाकर दिघेवार, गजानन रासकर,डाॅ.महेश बटेवार,श्रीराम बिजोरे, रवी चांदले, विकास बिचेवार ईत्यादी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
*स्वच्छतेकडून सुंदरतेकडे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad