Type Here to Get Search Results !

चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गणिततज्ञ भास्कराचार्यांच्या या कर्मभूमीला पर्यावरणासह धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. गेल्या वर्षी या गावात बोटनिकल गार्डन उभारण्यात आले. अशा प्रकारचा आगळावेगळा उपक्रम राबवून गावकऱ्यांनी आपलं वेगळंपण जपलेलं आहे. 
ऐतिहासिक महापुरूषांची स्मारकं उभी करत असताना शहर रचनेच्या दृष्टीने फार विचार करावा लागतो. कारण ही स्मारकेच या शहराच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि अस्मितेचे मानबिंदू ठरत असतात. शहराची शोभा वाढवणारी व पर्यटकांच्या आकर्षणाची स्थळे बनतात. अशाच प्रकारचे श्री शिवछत्रपती महाराजांचे हे अश्वारूढ स्मारक चाळीसगाव नगरीचे भूषण ठरेल. या स्मारकाचे अनावरण करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील, खा. रक्षाताई खडसे, गिरीश महाजन, आ.राजू भोळे, आ. एस.के.पाटील, आ. संजय सावकारे, आ.चंदुभाई पटेल यांच्यासह हे स्मारक उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण तसेच लक्ष्मण शिरसाठ, आप्पा कुडेकर, बापू शिरसाठ, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, नगराध्यक्षा आशालता पाटील, पालिका नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, शिवभक्त व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad