सोनगाव, ता - फलटन
*विकास बेलदार*
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी वद्यापीठां अंतर्गत कृषि महाविद्यालय महाड येथिल कृषि पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी संकेत संजय बुरुगले यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी आधारित उद्योग संलग्नता कार्यक्रम सन २०२१-२२ च्या अभ्यासक्रमांतर्गत सोनगव येथील शेतकऱ्यांना आधुनिक , सेंद्रिय व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.
कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थी स्वत:च्या गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत .यावेळी शेतकऱ्यांचा शेतीविषयक अनुभव जाणून घेऊन त्यांना व ग्रामस्थांना कोरोना महामारीचा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरक्षिततेचे उपाय, कोविड लसीकरण जनजागृती, माती परीक्षणाचे महत्व , एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन , फळबाग व्यवस्थापन,फुलबाग लागवडीस असणारा वाव, हरितगृह विषयी माहिती, बिजप्रक्रिया , औषधे फवारणी करताना घ्यावयाची काळजी, शितकक्ष निर्मिती,आणि नाबार्ड योजना तसेच विविध विषयांवर चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी सोनगव गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमासाठी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.gumavanekar सर , कार्यक्रम समन्वयक प्रा. Mahajan madam इतर तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.