Type Here to Get Search Results !

रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता ! गोंडे महागाव ते चिखली रस्ताची दैनिय आवस्था पुल खचला

गोंडे महागाव ते चिखली रस्ताची दैनिय आवस्था पुल खचला
 
  नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण 
                खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा

  नांदेड प्रतिनिधी
चिखली ते गोंडेमहागाव व अंध्र प्रदेश कडे जानारा मुख्य रस्ता असुन , रस्त्यावरील पुल खचल्यामुळे मोठ्या वाहनाचे दळणवळण थांबले असून, रात्रीच्या वेळेस येथे दुर्घटना होण्याचे चित्र आहे. सदरील पुलाचे काम लवकर करावे. अशी मागणी वाहनधारक व जनते तर्फे होत आहे. लवकर काम न झाल्यास येथे मोठी दुर्घटना नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे याची अजुन दखल घेण्यात आली नाही.

अतिदुर्गम भागात वसलेल्या चिखली, व गोंडेमहागाव, या गावांना जाण्यासाठी रस्ते सुद्धा चांगल्या प्रकारे नसून, या गावाला जाणे म्हणजे मुठीत जीव घेऊन प्रवास करत जावे लागते. त्यात चिखली, ते गोंडेमहागाव, जोडलेल्या रस्त्याचा दैनिय अवस्था असुन, मुख्य ठिकाणी पूल खचल्यामुळे येथे मोठी दुर्घटना नाकारता येत नाही. 

देशाचे पंतप्रधान व रस्ते वाहतूक मंत्र्यांनी पक्के घर पक्के रस्ते याचा नारा देत डिजिटल इंडियाकडे देश नेण्याचे उद्देश घेऊन काम करत आहे. परंतु तालुक्यात असे गाव आजही आहेत स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे पूर्ण झाले परंतु गावाला पक्के रस्ते पक्के घरच्या प्रतीक्षेत गावकरी आजही आहेत. चिखली ते गोंडेमहागाव रस्त्यावर खड्डा की खड्डात रस्ता, कळत नाही यात ठेकेदार सु:खी पण गावकरी व प्रवाशी. दुःखी असल्याचे दिसत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad