Type Here to Get Search Results !

हिमायतनगरात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचे अहवाल ओमायक्रॉन पॉजिटीव्ह

हिमायतनगरात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचे अहवाल ओमायक्रॉन पॉजिटीव्ह

हिमायतनगरात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचे अहवाल ओमायक्रॉन पॉजिटीव्ह
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून लसीकरण करून घ्यावे - डॉ.निळकंठ भोसीकर

हिमायतनगर प्रतिनिधी/जांबुवंत मिराशे 

 हिमायतनगर शहरासह नांदेड जिल्ह्यात विदेशातून ३०२ जण दाखल झाले होते. या सर्वांचे आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्यानंतर त्यापैकी हिमायतनगर येथील तिघांचे अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने या तीन संशयित रुग्णाचे जीनोम सिक्वेन्सिंग पुण्यातील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हा अहवाल येण्यासाठी तब्बल ५ दिवसाचा वेळ लागला, दरम्यान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील तीन पैकी त्या दोन कोरोना बाधीत रुग्णाचे सोक्वेन्सिंग अहवाल ओमायक्रॉन बाधीत असल्याचा आज प्राप्त झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे.
देशात व राज्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यामुळे विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविड तपासणी अनिवार्य करण्यात आली. लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमिक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविले आहे. पहिला डोस घेतलेल्या परंतु दुसरा डोस अपूर्ण असलेले व दुसऱ्या डोसची मुदत संपलेल्या व्यक्तींचे तातडीने लसीकरण करून घेऊन ओमिक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad