Type Here to Get Search Results !

थकबाकी नसताना विद्युत प्रवाह बंद केल्यास शेतक-यांनी वीज महावितरणला महाप्रसाद द्यावा : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख

थकबाकी नसताना विद्युत प्रवाह बंद केल्यास शेतक-यांनी वीज महावितरणला महाप्रसाद द्यावा : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख

फलटण प्रतिनिधी
मागील दोन वर्षांपासून संपुर्ण फलटण तालुक्यात वीज महावितरणने शेती पंपाचा विद्युत प्रवाह वारंवार बंद करुन शेतक-यांवर दहशत निर्माण केली आहे. सुरुवातीच्या काळात डिपी नादुरुस्त झाला अथवा चोरीला गेला की "आधी बील, मग डिपी" अशी योजना तयार केली. परिणामी शेतक-यांच्या शेतातील पीके जळुन फलटण तालुक्यातील शेतक-यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिली.
पुर्वी 2015 सालापर्यंत शेतकरी दर तीन महिन्यांनी वीजबीले दुरुस्त करुन नियमितपणे भरत होते. दरम्यानच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये महावितरणने वीजबीले शेतक-यांपर्यत पोहोचवली नाहीत. मग शेतकरी वीजबील भरणार तरी कसा ? परिणामी वीजबीले थकत गेली. अलीकडच्या काळात सरकारने शेतक-यांसाठी 31 मार्च 2022 पर्यंत वीजबीलात 50% सवलत उपलब्ध करून दिली. परंतु या सवलतीचा फायदा घेण्याची मुदत अजुन बाकी असतानाही वीज महावितरणने शेतक-यांना सळो की पळो करुन सोडले असल्याचे प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
अलीकडच्या दोन तीन महिन्यापासुन तर डिपीवरील विद्युत प्रवाह बंद करण्याचे आदेश फलटण तालुक्यातील वीज महावितरणने अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहेत. संपुर्ण डिपीचा विद्युत प्रवाह बंद झाल्यामुळे ज्या शेतक-यांनी वीज बीले भरली आहेत त्यांनाही नाहक वीज महावितरणच्या या हुकुमशाही राजवटीचा फटका बसत आहे. कित्येक शेतक-यांची वीजबीले थकीत नसतानाही महावितरणच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे विद्युत प्रवाहाअभावी पिके जळाल्याने शेतक-यांना नाहक आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले. 
भारत देशात लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आणि आपली न्याय व्यवस्था सांगते की, शेकडो आरोपी निर्दोष सुटले तरी चालतील. पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. परंतु वीज महावितरण फलटण तालुक्यात थकबाकी असलेले व नसलेले दोघांनाही कठोर शिक्षा देत आहे, शेतक-यांना आत्महत्येस प्रवृत्त करुन लोकशाहीची थट्टा केली आहे. मात्र येथुन पुढे वीजबील थकीत नसताना जर फलटण महावितरणने वीजप्रवाह बंद केला तर संबंधित थकबाकीदार नसलेल्या शेतक-यांनी फलटण महावितरणला जागच्या जागीच चांगला महाप्रसाद द्यावा व यथेच्छ स्वागत करावे. फलटण तालुका शिवसेना आता या लढ्याचे नेतृत्व करेल असे ठामपणे फलटण तालुक्यातील शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठीच्या उद्देशाने शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे सांगुन फलटण महावितरणने आता तरी शेतक-यांना योग्य न्याय देण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad