सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
फुलसावंगी( १४ ) स्थानिक पुण्येश्वर टेकडी च्या पायथ्याशी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्या निमित्त दर वर्षी प्रमाणे या हि वर्षी दि १५-१२-२०२१ ते २४-१२-२०२१ पर्यंत शिवापुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून कथा प्रवक्ता म्हणून ह भ प डॉ शरद आंबेकर हे राहणार आहेत
दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते ५.३० पर्यंत शिवपूराण कथा तर सायं ७ ते ८ हरिपाठ,तर रात्री ८ ते १० पर्यंत हरिकीर्तन अशी दैनंदिन कार्यक्रम आहेत यावेळी दि १५-१२ पासून रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनासाठी अनु क्रमे, श्री अशोक थोरात,कु कांचन शेळके,श्री आनंदराव हातलेकर,श्री अशोक साखरे,श्री शिवा महाराज,कु सुषमा पांडे,श्री नारायण शिंदे महाराज,श्री पवन खोडे, व्यसन मुक्ती सम्राट ह भ प श्री मधुकर खोडे महाराज यांचे कीर्तन तर दि २४-१२ ला श्री शरद आंबेकर यांचे काल्याचे किर्तनाने समाप्ती होणार असून महाप्रसादांने सप्ताहाची सांगता होणार आहे–
सामूहिक विवाह मेळावा””
या सप्ताहात शुक्रवार दि २४-१२-२०२१ ला
सकाळी ११ वा व्यसन मुक्ती सम्राट ह भ प मधुकर खोडे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आगाऊ खर्च करून कर्जबाजारी होण्यापेक्षा या भगवंताच्या मंडपात गरजू नि मंगल कार्य करावे तसेच या विवाह सोहळ्यासाठी मंगळसूत्रा पासून ते चप्पल बूट पर्यंत सर्व संसार उपयोगी वस्तू आयोजकांकडून देण्यात येतात हे विशेष
तेव्हा या ज्ञानयज्ञाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पुण्येश्वर सत्संग मंडळ, व्यापारी मंडळ,तसेच गावकऱ्यांनी केले आहे