Type Here to Get Search Results !

धामणी खंडोबा मंदिरात चंपाष्ठमीला दर्शनासाठी गर्दी भाविकांमध्ये उत्साही वातावरण

धामणी खंडोबा मंदिरात चंपाष्ठमीला दर्शनासाठी गर्दी भाविकांमध्ये उत्साही वातावरण
लोणी-धामणी : दिः०९/१२/२०२१. 
  पुणे व नगर जिल्हयातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी (ता.आंबेगांव) येथील श्रीक्षेत्र म्हाळसाकांत खंडोबा मंदीरात आज गुरुवारी( दि:०९)चंपाषष्ठीच्या मूहर्तावर देवाच्या सप्तशिवलिंगाचा अभिषेक व आरती झाल्यानंतर मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले. भाविकांच्या गर्दीने मंदीर परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले 
पुणे जिल्हयातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाचे कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात माघ यात्रोत्सव,चार सोमवती अमावस्या उत्सव,दोन चंपाषष्टी उत्सव,या प्रमुख उत्सवासह वर्षभरातील दिवाळी दसरा सण रद्द केले होते.दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे चंपाष्ठमीला गुरुवारी पहाटे चार वाजता श्री खंडोबाच्या मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तलिंगाचा पंचामृताने अभिषेक देवाचे परंपरागत मानकरी व सेवेकरी तांबे.भगत.मंडळी यांच्याकडून करण्यात आला.त्यानंतर सप्तलिंगावर साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाच्या पंचधातूच्या आकर्षक मुखवटयाची प्रतिष्ठापना तांबे,भगत.या सेवेकरी मंडळीनी केली.त्यानंतर या पंचधातूच्या मुखवटयाला व देवाच्या पूर्वमुखी श्री खंडोबा, म्हाळसाई,बाणाई व उत्तरमुखी खंडोबाची मानलेली बहीण जोगेश्वरी यांच्या विलोभनीय भव्य मूर्तीना वस्रालंकार चढविण्यात आले.
पहाटे पांचच्या सुमारास सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,नामदेव भगत,शांताराम भगत, राजेश भगत,निखील वाघ व प्रमोद देखणे यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा व महाआरती करण्यात आली त्यानंतर देवाचे पूजारी . भगत. मंडळीनी गाभार्‍यात सप्तशिवलिंगावर सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा उधळला. भगत मंडळीनी पुरणपोळी,साजुक तूप,दूध खसखसीची गोड खिर,सारभात,कुरडई पापडी,असा पंचपक्वानांचा नैवेद्य देवाला अर्पण केला. त्यानंतर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले यावेळी धामणी लोणी, खडकवाडी,गावडेवाडी, म्हाळूंगे पडवळ, तळेगांव ढमढेरे,अवसरी खुर्द खुर्द,संविदणे येथील मानकरी,वाघे व वीर मंडळी व सेवेकरी ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदीरात सकाळी नऊ वाजता ह.भ.प.धनंजय महाराज चव्हाण पाचोरेकर यांचे काल्याचे किर्तन झाले.या किर्तनाला आळंदी येथील तपस्या गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवृंद भजनी मंडळातील चाळीस बालवारकर्‍यांनी पखवाज वीणा व टाळमृदुंगाची साथ दिली.किर्तनाची व्यवस्था सुभाष तांबे,अविनाश बढेकर.अमोल गवंडी व भगत मंडळीनी ठेवलेली होती चंपाषष्ठीला देवकार्याची जागरणे करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केलेली होती,वाघे व वीर मंडळीची धावपळ होत असताना दिसत होती.दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठी भंडारा उत्सव समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.महाप्रसादाची व्यवस्था मच्छिद्र वाघ,किसनराव रोडे,आण्णा पाटील जाधव, डॉ.पाटीलबुवा जाधव,नामदेवराव जाधव,सुभाष काचोळे,सुभाष सोनवणे,दादाभाऊ भगत,प्रकाशनाना विष्णू जाधव,यांनी पाहीली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घातलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येत होता.शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन भाविकांना करण्यात येत होते.सुरक्षित अंतर ठेवून भाविक दर्शन घेताना दिसत होते.मंदिराच्या बाहेर तळी भंडाराचे.फुले व हार विक्रेते बसलेले दिसत होते चारचाकी व दुचाकी वाहनांची येजा चालू असल्याचे दिसत होते भाविक आवश्यक काळजी घेत होते.दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर चंपाषष्ठीला देवकार्याची जागरणे झाल्याने महीला भाविकांनी आनंद व्यक्त केला ही सप्तशिवलिंगे म्हणजेच खंडोबाचा परिवार समजला जातो या परिवारात सप्तंलिंगे म्हणजेच म्हाळसाई, बाणाई,हेगडे प्रधान, जोगेश्वरी, काळभैरवनाथ, घोडा व कुत्रा असे मानले जाते असे यावेळी भगत वाघे मंडळीनी सांगितले.
धामणी (ता.आंबेगाव ) येथे चंपाषष्ठी निमित्त मंदिरात जागरण गोंधळाचे कार्यक्रम झाले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News