लोणी-धामणी : दिः२२/११/२०२१. लोणी (ता.आंबेगाव ) येथील उपबाजारात दोन कोटी खर्चून बांधण्यात येत असलेल्या कांदा लिलाव शेडचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कृती उत्पन्न बाजार समिती मंचरचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली आहे. निकम पुढे म्हणाले की गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च २०२० मध्ये लोणी उपबाजारात प्रथमच मोकळ्या कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले.नजीकच्या काळात व्यापार वाढीसाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करण्यासाठी दोन कोटी रूपयो खर्चून बांधण्यात येत असलेल्या सुमारे १६ हजार कांदा पिशवी साठवण करण्याची क्षमता असलेल्या कांदा लिलाव शेडले काम अंतिम टप्प्यात आहे.६० मेट्रिक टन वजनकाटा उभारणीचे कामही अंतिम टप्प्यात आहे.दरम्यान बाजार समितीचे उपसभापती संजय शेळके,संचालक संखाराम काळे, बाळासाहेब बानखेले,बाळासाहेब मेंगडे,सचिन बोर्हाडे व महेंद्र वाळुंज,बाळासाहेब औटी यांनी कामाची पाहणी केली