*_रस्ता दुरुस्त करण्याचे उपसरपंच मयूर सरडे यांचे प्रशासनाला साकडे_*
ता 28-11/-2021
वार्ताहर -कैलास गायकवाड
आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे धामणी रस्त्याची अक्षरशः चाळण*
*_रस्ता दुरुस्त करण्याचे उपसरपंच मयूर सरडे यांचे प्रशासनाला साकडेपूर्वेकडील महत्वाचा रस्ता असणारा जो की खेड तालिक्याला तसेच शिरूर तालुक्यात जाण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे. पण शिरदाळे धामणी या पाच की.मी. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याने रोज वाहनांची वर्दळ असायची पण गेली दोन वर्षांपासून हा रस्ता वाहतुकीयोग्य राहिला नसताना, यावरून प्रवासी ,शाळकरी मुले, दूध वाहतूक करणारे गवळी ,शेती कामाला जाणाऱ्या गाड्या ह्या जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. या रस्त्याचे काम आम्ही शाळेत असताना झाले होते. त्यानंतर त्यावर तात्पुरती डागडुजी केली जाते पण पावसाळ्यात त्यात काहीच राहत नाही. असे शिरदाळे उपसरपंच मयूर सरडे यांनी सांगितले. लवकरात लवकर ह्या रस्त्याचे काम मार्गी लावावे असे त्यांनी संबंधित विभागाला विनंती केली आहे. रस्ता एवढा खराब झाला आहे की त्यावर साधी 2 चाकी चालवणे देखील मुश्किल झाले आहे. गेली दोन वर्षांपासून रस्ता मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे पण अजून साधं डागडुजी देखील झाली नसल्याने रस्ता खूपच खराब झाला आहे.