म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समितिच्या वतीने नगरविकास मंत्र्यांना निवेदन.
लोणी-धामणी : वार्ताहर =कैलास गायकवाड दिः२७/११/२०२१. प्रदिर्घ काळ रेंगाळलेल्या श्री म्हाळसाकांत पाणी योजनेच्या संदर्भात श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समितीच्या वतीने लोणी ते मंत्रालय असा पायी प्रवास करुण शासनाचे लक्ष वेधून घेणार आहे.त्यासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आवश्यक असणारा पत्र व्यवहार पूर्ण करण्यासाठी नीलेश साबळे यांनी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन त्यांना निवेदन दिले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समितिची बैठक व्हावी यासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री म्हाळसाकांत पाणी संघर्ष कृती समिती सोबत प्राथमिक चर्चा करणार असल्याचे सागितले.