Type Here to Get Search Results !

ए.सी. च्या आधुनिक युगात काही वर्षानंतर कोणाला सांगीतले की एक अशी गाडी होती जीच्या पाच उघड्या गेटमधून भर्र हवा खात लोक प्रवास करायचे. कोणाला खरे वाटणार नाही

ए.सी. च्या आधुनिक युगात काही वर्षानंतर कोणाला सांगीतले की एक अशी गाडी होती जीच्या पाच उघड्या गेटमधून भर्र हवा खात लोक प्रवास करायचे. कोणाला खरे वाटणार नाही.
ख-या अर्थाने ग्रामिण भारत डोळ्यासमोर ठेऊन महींद्रा कंपनीने बनवीलेली कमांडर गाडी ग्रामिण भारताचा श्वास होती.
2000 सी सी चे दमदार DI  इंजीन 62 हॉर्सपॉवर ची  शक्ती अशा आयुधांनी सज्ज हे वाहन ऑफरोडवर एखाद्या अजेय योद्ध्याप्रमाणे होते.
नदी नाले असो डोंगर द-या असो , रस्ता असो की नसो कमांडरला कोणतीच अडचण रोखु शकत नसे. एखाद्या वेळी बंद पडली तरी इंजिन स्ट्रक्चर एवढे सोपे की कोणताही रोडसाईड मेकैनिक समस्या दुर करुन टाकायचा.
अगोदर रीवर्स सहीत चार गीअरची कमांडर पुढे पाच गीअरची झाली. कमांडरच्या ड्रायव्हरची बैठक अशी होती की ड्रायव्हर तीरपा बसायचा. बाहेरुन पाहील्यावर स्टेअरींगच्या मागे ड्रायव्हर कधीच बसलेला दीसत नसे . उजव्या बाजूने थोडासा पेंदा बाहेर काढुन हात तीरपे करुन कमांडरच्या ड्रायव्हींग सीटवर माणुस एकदा बसला की साक्षात सारथी बनल्याची फीलिंग यायची. या तीरप्या बसण्याचा एक फायदा अजुन होता, ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर कमितकमी चारजण अजुन बसवता यायचे. दुरुन पाहील्यावर समोर बसलेल्या पाच जणांपैकी गाडी नेमका कोण चालवतोय हे कमांडर बनवीणारा इंजिनीअरही ओळखु शकत नव्हता.
गाडीची सीटिंग कैपिसिटी दहा सीट्सची असली तरी, फक्त दहा सीट्स बसविणे म्हणजे गाडीचा अवमान असायचा. 
मी सांगतो तुम्ही हीशोब लावा..
समोरच्या सीटवर ड्रायव्हरसहित पाच, मधल्या सीटवर सहा, मागच्या डाल्यातल्या समोरासमोरच्या सीटवर तीन इकडुन तीन तीकडुन, त्याच सीटच्या ग्यापीत एखादी बारीक बुढी कींवा दोन बारकी खोसायची. समोरच्या भागात असलेल्या स्टेपनीवर एक.. हुश्श..!! कीती झाले ? टोटल एकोणवीस, मागे लटकणारे उत्साही पोरं सोडुन द्या.. कंडक्टर गाडीच्या खालुनच ड्रायव्हरला चलो.. अशी हाळी द्यायचा आणी चालत्या गाडीत असा काही शीताफीने गाडीला लटकायचा की अहाहा..!! सारे प्रवासी एकदम इम्प्रेस.लहान पोट्टे बाट्टे त आपण पुढे चालून कंडक्टरच बनायचं हे ठरवून घ्यायचे. जवान पोरगी सोरगी अशा कौतुकाने कंडक्टरकडे पहायची जणु काही सुपरमैन होय..
खरी मजा तर इकडे कॉकपीटमध्ये यायची. ड्रावरसाहेब झोकात स्टेअरींग फीरवत आणी पैसेंजरच्या टांगीखालून हात घालून खपाखप गेर मारत साक्षात सुखोई 2000 चा आनंद घ्यायचे.
एखादा पैसेंजर ड्रायव्हरशी सलगी दाखवत, आपलं गाडीच्या बा-यातलं ज्ञान पाजळत म्हणायचा,
 " क्यों ड्राव्हरसाब, गाडी भोत कन्हार रई ?"

ड्रायव्हर त्याच्याकडे न पाहता उत्तर द्यायचा,
हौ साला, पम का काम करना पडता."

पैसेंजर नोबेल जींकल्याच्या अविर्भावात आजुबाजुच्या पैसेंजरकडे तुच्छतेने पहायचा..
कमांडर अशी खरी लेकुरवाळी गाडी, ग्रामिण भारताचे हीमोग्लोबीन. काळाच्या ओघात आता गडप होत चाललेली कमांडर एखाद्या थकलेल्या जीवट व्रुद्धाप्रमाणे खेड्यापाड्यात आपले अस्तीत्व टीकवत तग धरुन आहे. भवीष्यात पुढच्या पीढीला एक दुर्मीळ वाहन म्हणुन संग्रहालयात कमांडर पहायला मीळेल..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News