ESI हॉस्पिटलमध्ये माजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती
आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
सोलापूर : आज दिनांक 27 जुलै 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्य कामगार विमा दवाखाना (ई.एस.आय. हॉस्पिटल) येथे जे कर्मचारी कार्यरत होते सध्या सेवेत नाहीत अशा माजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नोकरीची अत्यंत आवश्यकता होती. त्यांच्याकडे कोणतेही उपजिवीकेचे साधन उपलब्ध नव्हते. अशा 20 पाल्यांना Tachno D Tech Solution या कंपनीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे कंत्राटी पध्दतीने नोकरी मिळालेली आहे. यामुळे सदर पाल्यांचा दैनंदिन उपजिवीकेचा प्रश्न सुटणार आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्य कामगार विमा दवाखाना (ई.एस.आय. हॉस्पिटल) येथील रुग्णांकरीता विविध सोयी-सुविधा राज्य शासनाकडे सतत पाठपुरावा करून उपलब्ध केल्याबद्दल राज्य कामगार विमा दवाखाना (ई.एस.आय. हॉस्पिटल) चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिरशेट्टी यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे मनापासून आभार मानले.