आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न
सोलापूर : आज दिनांक 27 जुलै 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या विविध समस्यांबाबत बैठक आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये चिंचोळी औद्योगिक वसाहतीचा संपूर्ण भाग D+ मध्ये सहभाग करून मिळावे जेणेकरून सर्वच उद्योजकांना समान न्याय मिळू शकेल. यापूर्वी 2015-16 मध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे सदरचा संपूर्ण परिसर D+ झोनमध्ये सामील करण्यात आला होता. परंतू आज हा औद्योगिक परिसर D व D+ अशा 2 परिसरात विभागला गेला आहे. तसेच टेक्सटाईल्स व टेक्निकल टेक्सटाईल्स पॉवर आणि कॅपिटल सबसिडीसंदर्भात ऑनलाईन पध्दतीमध्ये उद्भवणाऱ्या समस्या व गेल्या 6-7 महिन्यांपासून या सबसिडीची अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्यामुळे उद्योजकांना याचा लाभ मिळत नाही. तसेच अनेक नवीन उद्योजकांचे अर्ज ऑनलाईन पोर्टल बंद असल्यामुळे स्विकारण्यात येत नाही. तसेच चिंचोळी औद्योगिक परिसरामध्ये वाहनांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असल्यामुळे लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकरीता तेथील रस्यार्चे रुंदीकरण करून योग्य तेथे गतीरोधक करण्यात यावे आदि. विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी त्वरीत मा. वस्त्रोद्योग मंत्री श्री. अस्लम शेख साहेब व उद्योग खात्याचे प्रधान सचिव श्री. बलदेव सिंग साहेब यांच्याशी दुरध्वनीव्दारे संपर्क साधला व सदरच्या समस्यांबाबत सांगितले. सदर समस्यांचे निवारण होण्याकरीता मा. मंत्री महोदय यांच्याकडे लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले.
यावेळी सोलापूर इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष एम. केशव रेड्डी, उपाध्यक्ष डी. राम रेड्डी, उपाध्यक्ष मनिष देशमुख, सचिव गणेश सुत्रावे, खजिनदार वासुदेव बंग, सहसचिव कमलेश शहा, कार्यकारी मंडळ सदस्य सर्वश्री सप्रेम कोठारी, अभिषेक तापडीया, रामेश्वरी गायकवाड, सागर चिट्टे आदि. पदाधिकारी उपस्थित होते.