ढगफुटीने गेले काही दिवस रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरला वेठीस धरले होते.
पूरग्रस्त कुटुंबीयांना साह्य करण्यात खारीचा वाटा उचलत युवासेनेतर्फे आज पिण्याचे पाणी, अन्नधान्य, ब्लँकेट अशा प्रकारची मदतसामुग्री रवाना करण्यात आली.
आज चिपळूणच्या दिशेने मदत रवाना झाली आहे. रस्ते मोकळे झाल्यानंतर इतर भागातही मदत पोहोचवली जाईल. या ट्रक्सना पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी फ्लॅग ऑफ करत सर्वांना सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना केली.