बुरखा घालून आलेल्या युवकाच्या गोळीबारात एक युवक जखमी
शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे घडला थरार.
चंद्रपूर शहराने आज भर दिवसा गोळीबाराचा थरार अनुभवला असुन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलमधे एका बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार करून एका व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर शहरातील आझाद बगीचाच्या बाजुला असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे असलेल्या हॉटेल मधे आज्ञात बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार केला ह्यात एक नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला असुन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, शहर पोलीस निरीक्षक बहादुरे व पोलीस टीम मोक्यावर दाखल झाली असुन पोलीस कारवाई सुरू आहे.