अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड जेम्स ऑस्टीन III यांनी पंतप्रधानांशी केली चर्चा
शनिवार, मार्च २०, २०२१
0
सध्या भारतदौऱ्यावर असलेले अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड जेम्स ऑस्टीन III यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या शुभेच्छा पंतप्रधानांना कळवल्या.
पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील लोकशाही मुल्यांची जाण, विविधता आणि कायद्यावर आधारित व्यवस्था या सामायिक बाबींवर आधारित चांगल्या आणि जवळिकीच्या संबधांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीचा दृष्टीकोन मांडला व भारत-अमेरिका द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या महत्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना आपल्या शुभेच्छा कळवाव्यात असे त्यांनी ऑस्टीन यांना सांगितले.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण बंध दृढ करण्यास अमेरिका कटीबद्ध असल्याचा ऑस्टिन यांनी यावेळी पुनरुच्चार केला. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता व संपन्नता वाढीला लागावी ही अमेरिकेची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags