Type Here to Get Search Results !

अश्या नेत्याला आज मी पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं ऐकलं...



ज्या व्यक्तीला लहानपणापासून फक्त फोटो मध्येच पाहिलं होत ज्यांची भाषणं फक्त टीव्ही वर आणि मोबाईल वरच पहिली होती अश्या नेत्याला आज मी पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं... ऐकलं... जेव्हा तासनतास रांगेत उभा राहून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शन घेतांना जी भावना हृदयात तयार होते अगदी तीच भावना आज मी अनुभवली.. जे साहेबांवर टीका करतात त्यांना मला सांगू वाटतंय अरे ज्या व्यक्तीने सर्वात तरुण मुख्यमंत्री असण्याचा मान मिळवला, देशाचे संरक्षण मंत्री म्हणून पद भूषवल, जे सर्वात कर्तव्यनिष्ठ कृषिमंत्री होते, ज्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार #पद्मविभूषण" ने सन्मानित केलं, शिक्षण, क्रीडा, शेती, उद्योग सर्वच क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली, ज्यांनी महिलांना 50% आरक्षण देऊन सन्मान दिला त्यांच्यावर बोलताना निदान सत्य परिस्थिती चा अभ्यास तर करा...  ज्यांनी मृत्यूशी दोन हात केले अश्या नेत्या समोर सर्व गोष्टी शुल्लक आहेत.. 
अरे ज्यांची पूर्ण हयात लाल दिव्याच्या गाडीत गेली त्यांना कसला आलाय सत्तेचा मोह..? पण शेतकऱ्यांचा खरा कैवारी फक्त आदरणीय पवार साहेब..आज वयाची 80 वर्ष चालू असताना सुद्धा न थकता जो व्यक्ती अविरतपणे आपलं कार्य सुरू ठेवतोय तो नक्कीच तरुणांसाठी आदर्श आहे...ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला साहेब त्यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित होते.. साहेब,,पवार नावाशिवाय जे मोठे होऊ शकत नव्हते त्यांना तुम्ही मोठं केलं आणि आज ते तुम्हाला सोडून गेले, फितूर झाले पण साहेब जो पर्यंत माझ्यासारखी कार्यकर्ता तुमच्या सोबत आहे तो पर्यंत ना पवार ब्रँड संपणार ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad