Type Here to Get Search Results !

शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाण सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री गणेश गोडसे यांनी पंढरपूर प्रांताधिकारी यांना निवेदन दिले

*पंढरपूर: दुष्काळ ग्रस्त ग्रामीण जनतेला स्वस्त धान्य दुकानातून तात्काळ धान्य उपलब्ध करणे व चारा छावण्या सुरू करणे बाबत शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाण सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री गणेश गोडसे यांनी पंढरपूर प्रांताधिकारी यांना निवेदन दिले*      



                                     राज्यात भयानक दुष्काळ पडलेला असताना शासन केवळ दुष्काळी उपाययोजनांची घोषणा करून ग्रामीण जनतेच्या तोंडाला पाणी पुसत आहे ऑगस्ट महिन्यातच आम्ही दुष्काळ जाहीर केला हे सांगणारे शासन दुष्काळग्रस्त भागात जनतेला अन्नधान्य व जणावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी मार्च महिना आला तरी निष्क्रिय आहे सोलापूर जिल्ह्यातही दुष्काळाची दाहकता वाढली असून आपल्या जणावरांना जगवायचे कसे हा प्रश्न ग्रामीण जनतेसमोर  आवासून उभा आहे तर पिके जळून गेल्यामुळे कोरडवाहू शेतकर्याना स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करून देणे गरजेचे आहे या बाबत आदेश देऊनही अजून कार्यवाही होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे एकीकडे स्वस्त धान्य दुकानदार अडवणूक करते तर दुसरीकडे शासनाचा आदेश असुनही पुरवठा विभाग कार्यवाही करीत नाही हा दुर्दैवी प्रकार सुरू आहे तरी या बाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्या वतीने  उग्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पंढरपूर प्रांताधिकारी यांना शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठाण सोलापूर जिल्हा अध्यक्ष गणेश गोडसे यांनी दिले यावेळी निवेदन देताना विजय आरकीले. सोमनाथ ढवण. अंकुश गायकवाड किरण शहा.शिव बुध्द प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे आदी उपस्थित होते *SV न्यूज मराठी प्रतिनिधी विनायक पवार पंढरपूर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad