Type Here to Get Search Results !

बारामतीत जवानाला मारहाण होणे हे आपल्यासाठी लाजीरवाणे-अजितपवार

बारामतीत जवानाला मारहाण होणे हे आपल्यासाठी लाजीरवाणे. #अजितपवार #दपवारपॉवरऑफमहाराष्ट्र

बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सीआरपीएफचा जवान अशोक बाबुराव इंगवले याला आज बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप या जवानाने केला. यावर बोलताना आपल्या बारामतीत अशी गोष्ट घडत असेल तर ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट

असल्याची खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. 

अजित पवार म्हणाले, सीआरपीएफच्या जवानाला आपल्या बारामतीच्या पोलिस स्टेशनमध्ये 10-15 पोलिसांनी मारहाण केली आहे. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. आपण सगळेजण जय जवान जय किसानचा नारा देत असताना ही गोष्ट घडत असेल तर मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. पोलिसांना दिलेला अधिकार हा जवानांना मारण्यासाठी दिला आहे का? असा प्रश्नही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला.

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री गृहमंत्रीही आहेत. पोलिस खात्याचे प्रमुख आहेत. त्यांनी सर्वांना समज दिली पाहिजे सर्वांवर त्यांचा धाक असला पाहिजे असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad