Type Here to Get Search Results !

रणजित शिंदे आमदार झाले तर शिवरत्न बंगल्यावरसुद्धा कर्ज काढतील -राहुल बिडवे

रणजित शिंदे आमदार झाले तर शिवरत्न बंगल्यावरसुद्धा कर्ज काढतील -राहुल बिडवे


माढा विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार बबनराव शिंदे यांनी आपले चिरंजीव रणजीत शिंदे यांच्या अंगाला हळद लाऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवले त्यामुळे माढा माळशिरस व पंढरपूर या तालुक्यातील जनता सर्वसामान्य माणूस यांच्या मनामध्ये घराणेशाही विरोधात असंतोष निर्माण झाला त्यामुळे शिंदे परिवाराविरोधात माढा विधानसभेची निवडणूक ही हिमालय पर्वता एवढी असणार यात काही शंका नाही माढा व करमाळा या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावे शिंदे परिवाराने परस्पर कर्ज उचलून अनेक शेतकऱ्यांचे शिबील खराब केले आहे वर्तमानपत्रातुन देखील बातम्या येतात बोगस कर्ज प्रकरणाच्या परंतु दडपशाहीच्या जिवावर तसेच रेटून नेण्याच्या किमया आमदार महोदय करण्यात पीएचडी केली आहे त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघातून रणजीत शिंदे जर आमदार झाले तर शिवरत्न बंगल्यावर सुद्धा परस्पर कर्ज काढतील असा खळबळ जनक आरोप रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी केल्यामुळे मोहिते पाटील व शिंदे परिवार यांच्या गटात वादाची ठिणगी पडणार का यात काही शंका नाही

आमदार बबनराव शिंदे गेली तीस वर्षापासून माढा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत त्यांनी कायमच तालुक्यातील जनतेवर दडपशाही व दादागिरी आपल्याच घराण्याची राहिली पाहिजे यासाठी ते कायम आग्रही असतात मोहिते पाटलांपेक्षाही कित्येक पटीनं हिटलर शाही ही शिंदे घराण्याची माढा आणि करमाळा तालुक्यात आहे अनेक शेतकऱ्यांच्या नावावरती परस्पर कर्ज उचलतात त्यातूनच कारखान्यावर कारखाने सर्व खाजगी व सहकारी संस्था स्वतःच्या ताब्यात ठेवतात आणि सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे शिबिर हे खराब करतात त्यामुळे अशा हिटलरशाही प्रवृत्तीला राजकारणातून तडीपार करून टाकले पाहिजे यासाठी माढा पंढरपूर व माळशिरस तीन तालुक्यातील जनता सक्षम पर्याय शोधत आहे कारण शिंदे परिवाराच्या दडपशाहीला जाब विचारणारा कोणीच नसल्यामुळे माळरानावर गाढव सवाशिण अशी अवस्था झाली आहे परंतु माळशिरस व पंढरपूर तालुका हा या वेळी क्रांती घडवल्याशिवाय रहाणार नाही असे रोखठोक विधान राहुल बिडवे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News