उमेदवार ढाणकीचाच हवा...
ढाणकीकरांची मागणी
आगामी विधानसभा निवडणुकीत ढाणकी शहराला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी एका नामांकित ' डॉक्टर ' च्या नावाची चर्चा
ढाणकी कर करणार ' विजय ' ?
प्रतिनिधि मैनोदिन सौदागर निगंनुर :
विधानसभा निवडणुका म्हटल्या तर साधारणता सर्व पक्षाचा उमेदवार हा जवळपास उमरखेड किंवा महागाव शहरातील असतो परंतु यंदा ढाणकीकर गावातील आमदार व्हावा यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी 'विजयच्या' विजयासाठी टाईट फील्डिंग लावल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.
ढाणकी शहराला मोठा इतिहास असून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ढानकीकर नेहमी समोर असतात . मोठी बाजार पेठ असून गावावर अनेक खेडे अवलंबून आहेत. परंतु राजकीय दृष्ट्या ढाणकी मागास असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ढांणकीचाच उमेदवार असावा असा सूर पाहायला मिळत आहे. यासाठीच ढाणकीकरानी आपल्या हक्काचा गावातील आमदार व्हावा यासाठी गावातील एका नामांकित डॉक्टर कोरोना काळात असंख्य गरजूंना मदत करून धीर देणारे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या व्यक्तीला आगामी विधानसभा निवडणुकीत उभं करण्याची तयारी केल्याचे बोलले जात आहे. यामुळे तालुक्यांतील राजकीय समीकरण बदलणार हे नक्की.
"ढाणकी परिसरातील व ग्रामीण भागात माझी नाळ आधी पासुनच जुळलेली आहे. अनेक लोकांनी मला स्वतः भेटून आपण आगामी विधानसभा निवडणुक लढवायला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. अद्याप यावर मी निर्णय घेतलेला नसुन लोकांची जर इच्छा असेल तर लोकांच्या आग्रहाखातीर मी यावर नक्कीच सकारात्मक विचार करेन "
डॉ विजय कवडे
ढाणकी