Type Here to Get Search Results !

आ.बबनदादा शिंदे यांनी स्वतःच्या आमदारकीसाठी माढ्यात निबांळकरांचा बळी दिला-राहुल बिडवे

आ.बबनदादा शिंदे यांनी स्वतःच्या आमदारकीसाठी माढ्यात निबांळकरांचा बळी दिला-राहुल बिडवे


माढा लोकसभेची अतिशय तुरशीची निवडणूक झाली त्यामध्ये महायुतीचे पाच आमदार असताना सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील सव्वा लाखाच्या मताने निवडणुकीमध्ये मुसंडी मारून राज्यात स्वतःचा धबधबा कायम दाखवला सत्ता, साखर कारखाने ,पैसा याचा वारेमाप वापर करून सुद्धा भाजपचा या जिल्ह्यात ठावठिकाणा लागला नाही दोन लाखाचे लीड देणार असे आ.बबनराव शिंदे यांची सांगितले होते परंतु त्यांनी आपला स्वाभिमान शिवरत्न बंगल्यावरती गहान टाकून खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना अदृश्य हाताने मदत करून महायुतीचे खासदार रणजीत नाईक यांच्या पाठीत खंजीर खुपसला असा घनाघाती आरोप रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवृत्ती राहुल बिडवे यांनी केल्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे 

माढा मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार आहेत त्यामध्ये सर्वात मातब्बर आमदार असणारे बबन दादा शिंदे व संजय शिंदे असून सुद्धा त्यांनी मोहिते पाटलांना दोन्ही तालुक्यातून लीड देऊन विधानसभेची निवडणूक स्वतःसाठी सोयस्कर करून घेतली या निवडणुकीमध्ये स्वतः बबन दादा शिंदे यांनी जाहीरपणे सांगितले होते की दोन लाखाचे लीड देणार मग ते लीड का दिले नाही याचा खुलासा त्यांनी करावा व दोन्ही भावांनी मिळून आमदारकीचा राजीनामा द्यावा अन्यथा आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिंदे बंधूंनी गद्दारी केली आहे ती सविस्तरपणे देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे मांडणार असल्याचे राहुल बिडवे यांनी सांगितले

भारतीय जनता पक्षाने रणजीत नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्यापासूनच सर्वांचाच या उमेदवारीला विरोध होता असे असताना देशाची निवडणूक होती या ठिकाणी सर्वांमध्ये उमेदवारी देणे फायद्याचे ठरले असते घटक पक्षांना विश्वासात घेणेदेखील महत्वाचे होते मात्र सत्तेची हवा डोक्यात घेऊन रणजीत नाईक प्रचार करत होते कोट्यावधी रुपयांच्या गाड्या थाटामाटात कडक कपड्यात गुरमीत मग मगळुरीत ते गावागावातील पुढार्‍यांच्या बंगल्यावरती भेट देत होते सामान्य जनतेसोबत ते अजिबात संवाद ठेवतच नव्हते भाजपच्या घटक पक्षांना सन्मानपूर्वक वागणूक दिली गेली नाही कोणत्या बैठकीला बोलावले गेले नाहीत त्यामुळे सर्वच जनता भाजपचे घटक पक्ष रणजीत नाईक यांच्यावर चिडून होते खासदार होऊन पाच वर्ष झाले परंतु सामान्य माणसाच्या मदतीला कधीच खासदार आले नाहीत गावात कधी आले नाहीत त्यामुळे प्रचंड राग हा जनतेचा भाजप वरती होता मराठा आरक्षण शेतकरी प्रश्न दुधाचा एक वर्षापासून पडलेले भाव दुष्काळ महापूर यामुळे शेतकरी नुसता मेटाकुटीला आला आहे या सर्वांनी आपला राग लोकसभेच्या निकालावरती काढला आहे एवढ्या मोठ्या बलाढ्य प्रभावानंतर भाजप नेतृत्वाने शहाणे व्हावे व गावगाड्यातील शेतकरी सामान्य जनता यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे त्यांना न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या विधानसभेला भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी दिला

आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय शिंदे या दोन्ही भावांनी दोन लाखाचे लीड देतो म्हणून जाहीर करून माढा लोकसभेची जबाबदारी स्वीकारली होती परंतु विधानसभेला मोहिते पाटलांनी सहकार्य करावे या भूमिकेतून त्यांनी अदृश्य मदत करून रणजीत नाईक यांच्याशी गद्दारी केली आहे याबाबत आपण देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून सविस्तरपणे बोलणार आहे

राहुल बिडवे राज्य प्रवक्ते रयत क्रांती संघटना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News