सर्व विद्यार्थी फेटे बांधून व विद्यार्थिनी रंगीत साड्या घालून आज शाळेत दाखल झाले . सर्व विद्यार्थ्याची वाजत गाजत घोडेगाव नगरीतुन मिरवणूक काढण्यात आली.सर्व विद्यार्थ्यावर ग्रामस्थ , पालक यांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली .
यावेळी श्री कैलासबुवा काळे मा सभापती प. स. आंबेगाव , घोडेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ अश्विनी तिटकारे, उपसरपंच श्री कपिल सोमवंशी,ग्रामपंचायत सदस्या सौ सारिका घोडेकर , संगिता भागवत,जंबुकर मॅडम, श्री अमोलभाऊ काळे , श्री हेमंत काळे अध्यक्ष शा. व्य. समिती , संचालक अमित वाघमारे , श्री प्रमोद आर्विकर , डॉ. विलास काळे , श्री निळूकाका होनराव श्री . सागर पातकर , आपला आवाजचे पत्रकार श्री मोसीन काठेवाडी , झी 24 तासचे पत्रकार किशोर वाघमारे , शाळेच्या मुख्याध्यापिका अलका चासकर , राजाराम काथेर , सुनिता काठे , नंदा काठे , ललिता शेळके इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
सर्व विद्यार्थ्याना खाऊचे वाटप निळूकाका होनराव यांच्या हस्ते करण्यात आले.स्कुल बॅग व वॉटरबॅग चे वाटप श्री विक्रमसिग रजपूत व तेजस भिडे यांच्यावतीने करण्यात आले.मिरवणूकरथ सौजन्य श्री सागर पातकर यांचे होते . यावेळी मान्यवर व पहिलीच्या विद्यार्थ्याच्या हस्ते ग्रामपंचायतने दिलेल्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले .
मान्यवरांच्या उपस्थित विद्यार्थ्याना नविन पुस्तक वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजाराम काथेर तर आभार श्री. हेमंत काळे यांनी मानले.
प्रतिनिधी आकाश भालेराव
घोडेगाव