या पावसाळ्यातही बंद होणार रस्ता, शासनाचा पुन्हा येरे माझ्या मागल्या कारभार
मोखाडा : सौरभ कामडी
मान्सून अगदी उबराठ्यावर आला आहे यामुळे शेतकरी,पर्यटक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे मात्र गत वर्षिच्या पावसाळ्यात तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते बंद झालं होते कित्येक ठिकाणी विद्यार्थी रुग्ण यांना जोराच्या प्रवाहात जीव हातात घेवून प्रवास करावा लागला होता याची दखल घेवून त्यावेळी बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन यांना लोकांच्या जीवाची किती कणव आहे दाखवण्यासाठी पाहणी दौरे केले खरे मात्र यावर वर्ष भरा नंतरही काहीच कार्यवाही न झाल्याने करोळ पाचघर या गावांना जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची उंची वाढलीच नाही यामुळे यंदाही या गावचा रस्ता पाण्यात जावून संपर्क तुटणार हे नक्की यामुळे जेंव्हा एखादी घटना घडते तेंव्हा धावपळ करणाऱ्या प्रशासनाकडून पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे कारभार होत आहे याचा फटका येथील लोकांना बसणार असल्याचे दिसून येते आहे.
मोखाडा तालुक्यात गतवर्षी पावसाने उग्र रूप धारण केल्यानंतर अनेक गावांचा संपर्क तुटला होता यावेळी पुढील पावसाळ्यात अशी भयावह स्थिती उद्भवणार नाही अशी अपेक्षा होती मात्र आता दूसरा पावसाळा आला तरीही परिस्थिती जैसे थे राहिल्याने संताप व्यक्त होत आहे तालुक्यातील कोलेधव, कुर्लोद या गावांची स्थिती दैनिक पुढारी ने मांडल्यानंतर आता करोळ पाचघर या गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या पुलाचा विषय ही ऐरणीवर आला आहे खोडाळा कसारा मुख्य रस्त्यापासून किमान पाच किमी आत मध्ये असलेल्या या गावाची लोकसंख्या १हजार ७००च्या आसपास आहे करोळ गावाच्या अलिकडे एका ओढ्यावर छोटा पुल आहे मात्र तो कमी उंचीचा असल्याने पावसाचे प्रमाण वाढले की त्यावरून पाणी वाहते आणि रस्ता बंद पडतो. गेल्या वर्षी जुलै मध्ये दोन ते तीन दिवस हा रस्ता बंद पाडल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते.
यामुळे थेट गावांचा संपर्क तुटत असलेल्या कामांना प्राधान्य देवून ती कामे तातडीने होणे आवश्यक असताना आज वर्ष भरानंतरही परिस्थिती जैसे थे राहणार असल्याने मग काही अनुचित घटना घडल्या नंतर धावपळ करणारी यंत्रणा अगोदरच काम का करीत नाही हा खरा सवाल आहे यामुळे कुर्लोद असो कोल्हेधव की पाचघर पुन्हा येथील जनतेची पावसाळ्यात तारांबळ उडणार हे नक्की.
" या संदर्भात मी स्वतः भर पावसाळ्यात ही पाहणी केली होती तालुक्यात मोठया प्रमाणावर गरज नाही तिथे संरक्षण भिंती बांधणारे शासन अशा गरजेच्या ठिकाणची कामे मात्र करीत नाही हे दुर्दैव आहे यामुळे तालुक्यातील गतवर्षी पावसात संपर्क तुटलेल्या,कुर्लोद,थाळेकरवाडी,मुकुंदपाडा, पाचघर येथील गावांचा यंदाही संपर्क तुटला आणि काही घटना घडल्यास त्याला शासन जबाबदार असेल हे नक्की
प्रदीप वाघ
उपसभापती, पंस मोखाडा