शरद पवारांनी दिलेल्या एका मुलाखतीत, प्रफुल्ल पटेल 2004 पासून भाजपसोबत जाण्यास उत्सुक होते, असे म्हटले. यावर पटेलांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले. होय, मी 2004 सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन.