Type Here to Get Search Results !

यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत शंभर टक्के निकाल.


यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत शंभर टक्के निकाल.
आंबेगाव वसाहत- घोडेगाव
दिनांक 5/2/2024
आंबेगाव वसाहत येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचालित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय शाळेचा शासकीय इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले . अ- श्रेणीतील विद्यार्थ्यांना सात गुण , ब- श्रेणीतील विद्यार्थ्यांना पाच गुण व क- श्रेणीतील विद्यार्थ्यांना तीन गुण एसएससी परीक्षेमध्ये वाढीव मिळत असल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली.
इंटरमिजिएट परीक्षेत तीस विद्यार्थ्यांन पैकी अ - श्रेणीतून पाच विद्यार्थी, ब -श्रेणीतून पाच विद्यार्थी व क- श्रेणीतून विस विद्यार्थी उत्तीर्ण झाले, या विद्यार्थ्यांना वंदना मंडलिक यांनी मार्गदर्शन केले .
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे , विश्वस्त पुर्वाताई वळसे पाटील, मा . सभापती प्रकाश राव घोलप , सरपंच प्रमिला घोलप , उपसरपंच परविन पानसरे , ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पालक यांनी केले .
प्रतिनिधी आकाश भालेराव
घोडेगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad