लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अन्य पक्षांच्या नेत्यांचा समावेश?
आगामी काळात महाराष्ट्रात आणखी एक राजकीय उलथापालथ होईल, असा अंदाज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
या महिन्यापासून पक्ष पूर्णपणे 'इम्पोर्ट मोड'मध्ये जाईल.
मोठ्या राजकीय नेत्यांना पक्षात सामावून घेण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे.
पक्ष नेतृत्वाने ही जबाबदारी माझ्यावर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिली आहे, असे बावनकुळेंनी सांगितले.
