केमिकल- दारूगोळा कारखान्यात स्फोट; 9 ठार
दारूगोळा आणि रसायने असलेल्या नागपुरातील कारखान्यात स्फोट झाला.
यात 9 जणांचा अंत झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. भीषण स्फोटात इमारत उध्वस्त झाली आहे.
पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आतमध्ये जाऊ पाहणी केल्यानंतर परिस्थितीचा अंदाज येईल असे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले म्हणाले.