आप नेते राघव चड्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज लग्नबंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या उदयपूरमध्ये त्यांच्या शाही लग्नाचे विधी सुरू झाले असून व्हीआयपी पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आधीच पोहोचले आहेत. आता आदित्य ठाकरे उदयपूरला पोहोचले आहेत. आदित्य म्हणाले की आज राजकारण नाही, रागनीती आहे.