जव्हार :- सोमनाथ टोकरे
- दि -o3/09/२०२३ रोजी आर्यन आदिवासी फॉउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे आंबडी(पारी वली लाखात पाडा )येथे संस्थापक श्री कुंदन टोकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
आपली आदिवासी परंपरा कशी टिकवावी तसेच गेल्या चार पाच वर्षापासून आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही आदिवासी संघटना आदिवासीच्याअन्याय अत्याचार विरोधी आदिवासींचे हक्क मिळून देण्यासाठी सातत्याने सरकार दरबारी पाठपुरावा करत आहे . तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, कुपोषण शिक्षण विधवा अपंग याविषयी सामाजिक सहकारी योजना कार्य करत आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासींच्या अन्याय अत्याचार विरोधी आदिवासींच्या सरकारच्या योजना सर्व पदाधिकाऱ्यांनी आदिवासी यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्या पदाधिकाऱ्यांनी काम करण्यासाठी आवाहन केले. या हेतूने येणाऱ्या नियोजन करण्यासाठी वाडा तालुका स्तरावर बैठक पारिवली येथे आयोजित करण्यात आली होती.त्यानिमित्त ठाणे ,पालघर जिल्ह्यात पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची वारसा घेऊन आदिवासींचे महापुरुष आदिवासींची संस्कृती रूढी,परंपरा, आपले विविध पथनाट्य, तारपा नृत्य, ढोल नाच, तूर नाच,असे इतरही जास्तीत जास्त आदिवासींची संस्कृती जपत पथनाट्य आपली संस्कृती जपण्यासाठी कार्यकर्त्यांना पुढ आले पाहिजे. आर्यन आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने , आदिवासींच्या योजना सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन आर्यन फाऊंडेशनचे संस्थापक कुंदन टोकरे यांनी पदाधिकाऱ्यांला करण्यात आले. मिटींग दरम्यान निमित्ताने उपस्थित आर्यन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ टोकरे, सचिव संदीप महाकाळ, खजिनदार राजकुमार डवले, सरचिटणीस किरण लाखात, राज्य सदस्य राजू नानावे, कुणाल टोकरे, पालघर जिल्हाप्रमुख संदीप भुजारे , पालघर उपजिल्हाप्रमुख कैलास घाटाळ, वाडा तालुका अध्यक्ष अविनाश शिंदे, भिवंडी तालुका अध्यक्ष राजू माने, वसई तालुकाध्यक्ष गणेश पवार, जव्हार तालुका अध्यक्ष संतोष सोळे, विक्रमगड विधानसभा संघटक, विश्वनाथ भोये, विक्रमगड विधानसभा समन्वयक हनुमान माळ गावित, वाडा उपतालुकाप्रमुख छगन टोकरे, जव्हार तालुका सचिव गणेश दळवी, भिवंडी तालुका सचिव मान्यवरांच्या उपस्थितीत पदे नियुक्ती करण्यात आली . तसेच ठाणे पालघर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.