Type Here to Get Search Results !

ठाण्याच्या रुद्राक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामागिरी.



ठाण्याच्या रुद्राक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामागिरी.


आशियाई क्रीडा स्पर्धेत एअर रायफल्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक...


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भारतीय संघाचे अभिनंदन...

 

जव्हार :-सोमनाथ टोकरे


पालघर : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीतील एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्राक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे.चीनमधील फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. यात रुद्राक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरुवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करीत संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. रुद्राक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू आहे. त्याच्या नेमबाजीतील नैपुण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठबळ दिले आहे.मुख्यमंत्री शिंदे यांनी या तिघांचेही विशेष कौतुक करत म्हटले आहे की, भारताने नेहमीच आशियाई क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे. यंदाच्या या स्पर्धेत सुरुवातच या तिघांनी नेमबाजीत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन केली आहे. यासाठी या खेळाडुंचे, त्यांच्या प्रशिक्षक मार्गदर्शकांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुबियांचे देखील कौतुक करावे लागेल. अशा जिद्दी मेहनती खेळाडुंच्या कामागिरीच्या जोरावरच भारताची यंदाच्या या स्पर्धेतील कामागिरी अशीच दिमाखदार राहील आणि आपला भारत या स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडुंच्या चमूला शुभेच्छा दिल्या आहेत.

पालघरचे पोलिस :अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असलेल्या हेमांगिनी पाटील या दाम्पत्याचा रुद्राक्ष हा मोठा मुलगा आहे. रुद्राक्षच्या कामगिरीचा आज या दोघांनाही अभिमान वाटत आहे. ( चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आजच्या दुसन्या दिवशीची सकाळ भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आली. मागील दोन दिवसांपासून घरात देवाची प्रार्थना, मनाची चलबिचल अशा प्रचंड तणावामध्ये आम्ही वावरत होतो. रुद्राक्ष आणि त्यांच्या सहकान्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीला परमेश्वराचे आशीर्वाद लाभले आणि सकाळी त्याने देशाला दिलेल्या गोड बातमीने आमचा ऊर भरून आला.)- बाळासाहेब पाटील, रुद्राक्षचे वडील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News