Type Here to Get Search Results !

मंचर पोलीस स्टेशन येथे हिंदु जनगर्जना मोर्चाचे अनुशंगाने शांतता कमिटीची बैठक संपन्न.



दिनांक 24/06/2023 रोजी मंचर पोलीस स्टेशन हददीत मौजे मंचर गावात सकल हिंदु समाजाचे वतीने हिंदु जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असुन त्या अनुशंगाने पुणे ग्रामीण पोलीस दलाचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. अंकीत गोयल यांनी सदर मोर्चाचे अनुशंगाने मंचर येथे दिनांक 22/06/2023 रोजी भेट देवुन मोर्चाचे रूटची पाहणी केलेली असुन त्याअनुशंगाने संबंधीताना योग्य त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस अधिक्षक श्री. अंकीत गोयल यांनी आदेशीत केल्याप्रमाणे मंचर पोलीस स्टेशन हददीतील शांतता कमीटीचे सदस्यांची आज रोजी मंचर पोलीस स्टेशन येथे बैठक पार पडलेली असुन सदर बैठकीस श्री. सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग खेड, श्री. सतीश होडगर पोलीस निरीक्षक मंचर पोलीस स्टेशन, किरण भालेकर, बालाजी कांबळे सहा.पोलीस निरीक्षक हे हजर होते त्यावेळी पोलीस प्रशासनाने दिलेले सुचनांप्रमाणे मोर्चातील सर्व नागरीकांनी पालन करणेबाबत आव्हाहन करण्यात आलेले असुन सदर मोर्चामध्ये कोणत्याही प्रकारचा शातता भंग होणार नाही याची दक्षता घेणेबाबत कळविले आहे. सदरचा मोर्चा हा मंचर एसटी स्टॅन्ड पारस लाॅज, लक्ष्मी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चैक, छत्रपती संभाजी महाराज चैक, पिंपळगांव फाटा, हायवे रोड, लक्ष्मी रोड मार्गे पुन्हा श्री. छत्रपजी शिवाजी महाराज चौक मंचर या मार्गे जाणार असुन श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चानंतर सभा घेण्यात येणार आहे. तरी सदर मोर्चात सहभागी होणार सर्व नागरीकांनी सदर मोर्चा शांततेमध्ये कसा पार पाडला जाईल याची दक्षता घ्यावी असे पोलीस प्रशासनाचे वतीने आव्हाहन करण्यात आलेले आहे.


        (सतीश होडगर)

        पोलीस निरीक्षक

  मंचर पोलीस स्टेषन, पुणे ग्रामीण


 प्रतिनिधी - आकाश भालेराव

मंचर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad