प्रकाश आंबेडकरांचा अजित पवारांबाबत मोठा दावा
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. अजित पवारांनी केसेस काढून घेण्यासाठी पहाटेचा शपथविधी केला, असा दावा आंबेडकरांनी केला आहे. त्यांनी आपल्या केसेस विथड्रॉ केल्या. केसेस काढून घेतल्यानंतर सरकारमधून बाहेर पडले आणि पुन्हा राष्ट्रवादीत गेल्याचे आंबेडकरांनी माध्यमांना सांगितले. तसेच, वंचितचा महाविकास आघाडीसोबत काही समझौता नाही, संबंध नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.